जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या शाळा, आरोग्य संस्था व ICDS कार्यालयांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि सेवा गुणवत्तेच्या उन्नतीसाठी हे पारदर्शक व तांत्रिक CSR मागणी व्यवस्थापन पोर्टल कार्यरत आहे.
या पोर्टलद्वारे कार्यालय प्रमुखांना आवश्यक साहित्य, दुरुस्ती कामे, बांधकाम सुविधा तसेच यंत्रसामग्रीसाठी CSR अंतर्गत मागणी नोंदवणे, मागणी स्थिती पाहणे आणि मंजुरी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पारदर्शकपणे पूर्ण करता येते.
श्री अंकित
मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रशासनाच्या वतीने आपणास अवाहन करु इच्छितो की, आम्ही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरीकांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यासाठी शासकीय निधी व्यतिरिक्त आपल्या सारख्या यशस्वी व सामाजिक योगदान देणाऱ्या उद्योजकांच्या सहकार्याची शासनास मदत होते.
प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरीकांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, पशुपालकांचे उत्पन्नात वाढ होण्यासाठी आपल्या सारख्या सामाजिक भान ठेवणाऱ्या व सामाजिक हित जोपासण्याचा उद्येश ठेवणाऱ्या उद्योजकांची भरीव मदत होईल,अशी आम्हास अपेक्षा आहे.
आपल्या मार्फत आम्हास आर्थीक सहाय्य केल्यास आम्ही त्यातून उत्कृष्ट शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, यांचेसाठी शाळेचे खोली बांधकाम, उपकेंद्राचे बांधकाम, अंगणवाडीतील मुलांना खेळण्याचे साहित्य, स्वच्छता गृह, स्वच्छ पाण्यासाठी पाणी शुध्दीकरण यंत्रणा, ग्रामीण भागातील कार्यालयात सोलर System, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळांमध्ये लायब्ररी, संगणक प्रिंटर, प्रोजेक्टर ई. सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. त्यामध्ये आपला सहभाग नोंदवून घेऊ इच्छितो जेणे करुन राज्यात सकारात्मक संदेश जाईल.
आम्ही आपल्या कंपनीला वेळोवेळी प्रगती अहवाल देऊ, ज्यामुळे आपण निधीचा उपयोग कसा केला जात आहे हे पाहू शकता. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांमध्ये आपली मदत विकासाचे नवे मानक निर्माण करेल. कर्मचारी आणि अधिकारी आपल्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य करण्यास प्रेरित होतील.
आमचे उद्दिष्ट म्हणजे आपल्या निधीचा परिणाम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि योजनांचा लाभ मिळवणे. आपली मदत जिल्ह्यातील जीवनमान सुधारण्यात मोलाची ठरेल. आम्ही आपल्या विश्वासाला हरकत न करता पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन राखण्याचा प्रयत्न करू.
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
आरोग्य / शिक्षण / ICDS विभागांतील कार्यालयांचे डिजिटल व्यवस्थापन.
कार्यालयांना आवश्यक सामग्री / इमारत सुविधा / यंत्रसामग्री नोंदवण्याची सुविधा.
विभागानुसार, तालुक्यानुसार, कार्यालयानुसार रिअलटाइम रिपोर्टिंग.
समाजाच्या गरजा ओळखून, पारदर्शकतेसह आणि जबाबदारीने CSR उपक्रम राबवून शाश्वत विकास साधण्याचा आमचा संकल्प आहे.
अधिक जाणून घ्याशिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी प्रभावी आणि परिणामकारक उपक्रम राबविण्यासाठी आमच्यासोबत सहभागी व्हा.
अधिक जाणून घ्याविविध शासकीय विभाग व पंचायत समित्यांकडून सादर झालेल्या मागण्यांची माहिती पाहून टिकाऊ व सर्वसमावेशक विकासासाठी सहभाग घ्या.
मागण्या पहाजिल्ह्यात राबविण्यात येणारे CSR आधारित कार्यक्रम, उपक्रम व नाविन्यपूर्ण योजना येथे पाहा.
अधिक जाणून घ्याCSR उपक्रमांमुळे घडलेले सकारात्मक बदल, प्रेरणादायी अनुभव आणि यशस्वी प्रकल्पांची माहिती येथे वाचा.
अधिक जाणून घ्या