पोर्टल बद्दल माहिती

CSR मागणी व्यवस्थापन पोर्टल हे जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शासकीय कार्यालयांसाठी CSR (Corporate Social Responsibility) निधीचा पारदर्शक, नियोजनबद्ध व प्रभावी उपयोग करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

१) पोर्टल म्हणजे काय?

या पोर्टलचा उद्देश जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), उपकेंद्रे, ICDS केंद्रे, अंगणवाडी तसेच इतर शासकीय कार्यालयांच्या पायाभूत व विकासात्मक गरजा संगणकीकृत पद्धतीने नोंदवणे, त्यांचे परीक्षण करणे व CSR निधीतून त्या गरजांची पूर्तता सुलभ करणे हा आहे.

प्रत्येक कार्यालयाकडून ऑनलाइन मागणी नोंदवली जाते आणि संबंधित विभाग, जिल्हा स्तरावरील समिती व CSR भागीदार यांच्या माध्यमातून मागण्यांची अंमलबजावणी केली जाते.

२) पोर्टलचे उद्दिष्ट
पारदर्शकता जवाबदारी वेगवान प्रक्रिया डेटा आधारित निर्णय
३) कोण वापरू शकतात?
प्रशासन (Admin / HQ)
  • कार्यालय व विभाग मास्टर व्यवस्थापन.
  • CSR मागण्यांचे परीक्षण व मंजुरी.
  • अहवाल, मॉनिटरिंग व डॅशबोर्ड.
विभागीय अधिकारी / कार्यालय प्रमुख
  • कार्यालयाच्या गरजा नोंदवणे.
  • मागणी स्थिती तपासणे.
  • पूर्ण कामाचा अभिप्राय.
CSR भागीदार
  • उपलब्ध CSR प्रकल्प पाहणे.
  • प्राधान्यक्रमानुसार सहकार्य.
  • Impact / Outcome Reporting.
४) पोर्टलमधील प्रमुख मॉड्युल्स
कार्यालय मास्टर
  • आरोग्य – PHC, Subcentre
  • शिक्षण – शाळा
  • ICDS – अंगणवाडी
CSR मागणी
  • तालुका / विभाग निवड
  • काम / साहित्य प्रकार
  • अंदाजित खर्च
Scrutiny
  • तांत्रिक पडताळणी
  • वित्तीय तपासणी
  • CSR समिती मंजुरी
रिपोर्टिंग
  • मंजूर / प्रलंबित
  • खर्च स्थिती
  • PDF / Excel
५) मागणी प्रक्रिया – पायरी पायरीने
  1. कार्यालय प्रमुख लॉगिन करून तालुका व कार्यालय निवडतो.
  2. CSR अंतर्गत आवश्यक काम / साहित्य निवडतो.
  3. संख्या, खर्च व माहिती भरून मागणी सबमिट करतो.
  4. विभागीय अधिकारी व CSR समितीकडे मागणी जाते.
  5. मंजुरीनंतर CSR भागीदारामार्फत अंमलबजावणी.
  6. काम पूर्ण झाल्यावर फोटो / अहवाल अपलोड.

प्रत्येक टप्प्यावर मागणीची स्थिती पोर्टलवर रिअलटाइम दिसते.

६) डेटा सुरक्षा व पारदर्शकता
  • Username / Password आधारित सुरक्षित लॉगिन.
  • Role Based Access – Admin, Officer, User.
  • डेटाबेसमध्ये सुरक्षित नोंदी.

* हे पोर्टल CSR कायदे, शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार विकसित आहे.